पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झालेल्या स्वयंघोषित डॉनचा खेळ खत्तम… दगडानं ठेचून केली हत्या

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २३-५-२०२१.
,(दि.२२मे) : औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज, येथील बजाजनगर परिसरात कुख्यात गुन्हेगार आणि खूनातील आरोपी विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे, या स्वंयघोषित डॉनची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी महाराणा प्रताप चौकात मृत विशालला गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत विशालनं एक वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं एका युवकाचा खून केला होता. त्यामुळे बदलेच्या भावनेतून स्वयंघोषित डॉन विशाल फाटेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्यावर्षी वडगावतील योगेश प्रधान खून प्रकरणातही विशालचा सहभाग होता. वर्षभर कारागृहात राहिल्या नंतर १५.दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही तरुण एका तरुणाला बेदम मारत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेले दोन दगड देखील होते.