कुसेगाव जिल्ह्यात स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न करणार सरपंच छाया शितोळे

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१३-६-२०२१.
पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात श्री.भानोबा देव आणि दानव युद्ध प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे दौंड तालुक्यातील डोंगराच्या खुशीत आणि नैसर्गिक सौंदर्यान नटलेले गाव कुसेगाव या गावाला विकास कामानी नटवून जिल्ह्यात स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय सरपंच छाया शितोळे यांनी व्यक्त केला गावात अशी केली विकासकामे सरपंच शितोळे म्हणाल्या सरपंचपद स्वीकारल्या नंतर सर्व सदस्यांना विश्वासाघात घेत हायमास्ट विद्युत दिवे बसवून चव्हाणवस्ती अंधार मुक्त केली . हिंदू मुस्लिम समाजाचा एकोपा असलेल्या पीर दर्गा परिसरात विद्यूतीकरण करुन सुशोभीकरण केले. गावातून गेलेल्या अष्टविनायक मार्ग रस्त्याच्या दुतर्फा पाटस रोडच्या बाजूने नैसर्गिक सौंदर्यात भर पडण्यासाठी स्वखर्चाने विविध प्रकारची वृक्ष लागवड केली सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था केली सुपा ते कुसेगाव हद्यीतील मयुरेश्वर अभयारण्य वगळता अपूर्ण रस्त्याची कामे मार्गी लावली पंधराव्या वित्त आयोगातुन स्मशानभूमीचे सुशोभीकरण केले ५०.हजार निधी उपलब्ध करून शेड व चौथारा दुरुस्ती चे काम स्व खर्चाने केली आहे .