मराठी

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संतापानंतर आरटीओने रुग्णवाहिकांचे दरपत्रक केले जाहीर;

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २४-४-२०२१.
पिंपरी-चिंचवडकरहो “या” दरानुसारच अॅम्ब्युलन्ससाठी मोजा पैसे

पिंपरी, चिंचवड दि. २० – कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत तसेच उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड मधील खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक लूट सुरू आहे. यासंदर्भात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पुणे जिल्ह्याचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णवाहिकांनी रुग्णांना ने-आण करण्यासाठी किती दर आकारावेत याचे प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) दरपत्रक जाहीर केले आहे. तसेच हे दरपत्रक संबंधित रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. या दरपत्रकापेक्षा जास्त भाडे आकारल्यास या ईमेल आयडीवर तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. अशा तक्रारींची नोंद घेऊन संबंधित रुग्णवाहिकेवर आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील खासगी रुग्णवाहिका रुग्णांना तासाला १ हजार ते ३ हजार रुपये दर आकारत आहेत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पावलेले मृतदेहाचे दहन करण्यासाठी चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागते. त्यानुसार मृताचे कुटुंबीय रुग्णवाहिकेला तासाला १ हजार रुपये याप्रमाणे ४ ते ५ हजार रुपये, तर ३ हजार रुपये याप्रमाणे १२ ते १५ हजार रुपये मोजत आहेत. जनतेची होणारी ही लूट म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार असल्याचा संताप आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला होता. यासंदर्भात त्यांनी बुधवारी (दि. २१) पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्व खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन या कार्यालयामार्फत संचलन करण्याची मागणी केली होती.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button