मराठी

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला टप्पा मिळाला ; कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार देण्यास सुरुवात – ॲड. नितीन लांडगे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, २२-४-२०२१.
पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीच्या १५.एप्रिलच्या बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावानुसार आज मंगळवारी (दि.२०.एप्रिल २०२१.) ९६०.इंजेक्शनचा पहिला टप्पा महापालिकेला मिळाला आहे. तसेच मागील स्थायी समितीच्या बैठकीत कोरोना उपचारासाठी मनपाच्या विविध रुग्णालयात आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल असणा-या रुग्णांना पौष्टिक आहार देण्यास मंगळवार (दि.२०.एप्रिल) पासून सुरुवात झाली आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
मागील स्थायी समितीच्या सभेत ७०५०.रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा ठराव पास करण्यात आला होता. कोरोनाच्या उपचारासाठी वायसीएम, नवीन भोसरी, जीजामाता, तालेरा आणि आकुर्डी रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल आहेत. यातील काही रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जातात. परंतू मागील पंधरवड्यात या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे मनपाच्या रुग्णालयात दाखल रुग्णांना मनपाच्या वतीने मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या गरजू रुग्णांना याचा उपयोग होईल.
तसेच मनपा विविध रुग्णालयात आणि संस्थापक विलगीकरण केंद्रात दाखल असणा-या कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून पुरवठादारांना प्रतीताट पन्नास रुपयांपर्यंत वाढ देण्याचा ठराव पास करण्यात आला होता. त्यानुसार आज मंगळवार दिनांक २०-४-२०२१.
पासून वाढिव पौष्टिक आहार रुग्णांना देण्यास सुरुवात झाली आहे. मंजूर झालेल्या ठरावानुसार सर्व रुग्णांना सकाळी नाष्टा, चहाबरोबर दोन उकडलेली अंडी, दुपारच्या जेवणात वरण, भात, चपाती, सुकी भाजी आणि पातळ भाजी, सॅलड देण्यात येणार आहे. सायंकाळी चहा, रात्रीच्या जेवणात वरण, भात, सुकी भाजी, पातळ भाजी, सॅलड आणि शेंगदाणा किंवा राजगी-याचे दोन लाडू तसेच दोन पाण्याच्या बाटल्या देण्यास आज पासून सुरुवात झाली आहे अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button