मराठी

एकनाथ खडसें पाठोपाठ भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर रक्षा खडसे यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,३-६-२०२१. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या कोथळी, येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे, यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना केलेल्या गंभीर आरोपांनंतरही फडणवीस घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकनाथ खडसें,पाठोपाठ भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं आहे. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जाहीर प्रवेशात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस, यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता. दरम्यान खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे अद्याप भाजपातच आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button