मराठी

*माय-लेकराच्या खुनाने पुणे हादरले मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१७-६-२०२१.
माय-लेकराचा खून करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह मंगळवारी पहाटे पुरंदर तालुक्यातील खळद गावच्या हद्दीत आढळून आला. तर, त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह नवीन कात्रज बोगदा परिसरात जांभुळवाडी येथे महामार्गाजवळील एका हॉटेलजवळ सायंकाळी आढळून आला आहे. याप्रकरणी सासवड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आयान शेख (वय ६.) आणि त्याची आई आलिया आबिद शेख (वय ३५.) अशी खून झालेल्याची नावे आहेत. हे दोघेही धानोरी परिसरात राहण्यास होते. आलिया यांचा मृतदेह सासवड-जेजुरी रस्त्यावरील खळद येथे एका हॉटेलच्या समोर मंगळवारी सकाळी आढळून आला होता. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, खळदजवळ आढळून आलेल्या महिलेची ओळख सायंकाळी पटविण्यात आली. तिच्या गळ्यावर वार करुन खुन केल्याचे आढळून आले.आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button