मराठी

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने ७.वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१८-६-२०२१.
पुणे :: खून, दरोड्याची तयारी, दंगा करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील गेल्या सात वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथकाने ……. पोलिसांनी जेरबंद केलं (दि.१५.) ही कामगिरी केली.सतीश दिलीप सूर्यवंशी (वय ३०, रा. बालाजीनगर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात गेल्या सात वर्षापासून फरार होता. दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी दहशतवाद विरोधी कक्षाचे मोसिन शेख यांना फरार आरोपी सतीश सूर्यवंशी ससेवाडी परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.अटक आरोपी सराईत असून त्याच्यावर यापूर्वी पुणे शहर व पुणे ग्रामीण या ठिकाणी
कारवाई केली होती.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button