पुणे* *औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड कुटुंबाविरुद्ध मोका…

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे. महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,१८-८-२०२१.
पुणे- कौटुंबिक छळासह खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व जावयासह आठ जणांविरुद्ध पुणे पोलिसांनीही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यापुर्वीच गायकवाड कुटुंबावर ‘मोका’नुसार कारवाई केली आहे, त्यापाठोपाठ पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही त्यांच्याविरुद्ध ‘मोका’चा बडगा उगारला
नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड.(सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध), सोनाली दिपक गवारे (वय ४०), दिपक निवृत्ती गवारे,(वय ४५. दोघेही रा. गजानन महाराज मंदिराजवळ, शिवाजीनगर), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.सर्वोदय रेसीडेन्सी, विशालनगर, पिंपळे निलख, मुळ रा. श्रीरामपुर, नगर), सचिन गोविंद वाळके, संदिप गोविंद वाळके, (दोघेही रा.विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.त्यांच्या विरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.