पुणे* *कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर नेत्यांचा काही दोष नाही – चंद्रकांत पाटील

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२२-६-२०२१.
पुणे : ‘संयोजकांनी कार्यक्रम ऑनलाईन दाखवले तर गर्दी होणार नाही. अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या अनुयायांनी अडचणीत आणू नये, अशा शब्दांत पाटील यांनी पवार यांचा बचाव करून गर्दीचे खापर कार्यकर्ते आणि नागरिकांवर फोडले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमालाही गर्दी होण्याच्या शक्यतेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बचावात्मक भूमिका घेतली. कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर नेत्यांचा काही दोष नाही. प्रत्येक वेळी टीका करायला पाहिजे असे नाही. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे
. लोकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.राजकीय परिणामांची काळजी न करताही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही हिंदुत्ववादी आहोत असे वाटते याचे मला विशेष वाटते. पण अठरा महिन्यात हिंदुत्वापासून कसे बाजूला गेलात, महाशिवआघाडीची महाविकास आघाडी कशी झाली, अशी टीका पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.