पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरीताची निवड चाचणी स्पर्धा रविवार दीनांक १७. आक्टोंबर २०२१. रोजी होणार

संवाददाता तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,११-१९-२०२१

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाची गादी व माती विभागाकरीता महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरीताची निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक,१७. आक्टोंबर २०२१. रोजी घेण्याचा निर्णय पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने घेण्यात आला .
१०. मार्च २०२१. रोजी जिल्हा निवड चाचणी घेण्यात आली होती त्या निवड चाचणीमध्ये प्रत्येक वजनगटामध्ये सेमीफाइनल करीता खेळलेले ४.कुस्तीगीर यांना १७. आक्टोंबर २०२१.च्या जिल्हा निवड चाचणीमध्ये सहभागी होता येईल .  त्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुका संघास माती व गादी करीता प्रत्येक १. वाईल्ड कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन ते त्याचा वापर करुन गादी व माती विभागामध्ये निवड चाचणी करीता निवड झालेल्या कुस्तीगीरा व्यतिरिक्त प्रत्येक एक एक कुस्तीगीराची सहभागा करीता शिफारस करु शकतात .
जे कुस्तीगीर ग्रिकोरोमन स्पर्धेत सहभागी होतील  त्यांना फ्रीस्टाईल स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये सहभागी होता येणार नाही . गादी व माती विभागामध्ये जे कुस्तीगीर जिल्हा निवड चाचणी करीता सहभाग नोंदवु शकतात त्यांची यादी मंगळवारी जाहीर होईल . त्या व्यतिरिक्त इतर कोणास निवड चाचणीमध्ये सहभागी होता येणार नाही . वजनासाठी २. कीलोची सुट देण्यात येईल . स्पर्धेचे ठीकाण मंगलवार दिनांक. १२. आक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येईल. जिल्हा निवड चाचणीमध्ये सहभागी कुस्तीगीरांची यादी मंगलवार दिनांक,१२. आक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येईल .

( अधिक माहीती करीता तालुका कुस्तीगीर संघाशी संपर्क करावा )

कळावे आपला .
पै संदीप उत्तमराव भोंडवे,
अध्यक्ष- पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ. पै बाळासाहेब चौधरी उपाध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed