पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय … राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१९-६-२०२१.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे देशातील अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यातीच पुनरावृत्ती पुणे भाजप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. पंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोप जगताप यांनी केलाय.
जगताप यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कारभारावर टीका करताना आगामी निवडणुकीत पुणे महापालिकेलीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा दावा केला आहे. गोरगरीबांचे नाव पुढे करून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर, हे एकप्रकारे इस्टेट एजंट असल्याप्रमाणेच काम करत असल्याची टीका जगताप यांनी केलीय. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मर्जीनेच हा कारभार सुरू असल्याची शक्यताही जगताप यांनी व्यक्त केली आहे.