पुणे* *मागासवर्गीय उद्योजकांना योजनांचा लाभ, अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी एक कृती दल स्थापन करणार – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२७-७-२०२१.
पुणे : मागासवर्गीय उद्योजकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ व्हावा आणि त्यांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा …….. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघातर्फे आयोजित बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
लोकशाहीची पाळेमुळे आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेली आहेत, असे सांगून डॉ. राऊत म्हणाले, राज्यघटनेने जरी राजकीय समतेची हमी दिली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांचे यावर समाधान झाले नव्हते. त्यांना अपेक्षित असलेली आर्थिक व सामाजिक समता निर्माण होण्याची गरज आहे. डॉ.आंबेडकरांना अपेक्षित आर्थिक व सामाजिक लोकशाही वास्तवात आणण्यासाठी मागासवर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण महत्त्वाचे असून मागासवर्गीयांच्या उद्योगांना शासकीय पाठबळ लाभल्याशिवाय हे शक्य होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ.राऊत यांनी केले.