पुणे आरोपीचे पलायन केल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह 5 जण निलंबित

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२२-६-२०२१.
पुणे :: अभिवचन रजा (तातडीची रजा) कालावधीत कैद्याने पोलिसांच्या रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी पुण्यातील कोर्ट कंपनीच्या पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळउडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निबांळकर, पोलिस हवालदार बाळु रामचंद्र मुरकुटे, शरद नाथा मोकाते, महावीर लक्ष्मण सामसे, किशोर चंद्रकांत नेवसे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहे. अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. वेदप्रकाशसिंग विरेंन्द्रकुमार सिंग (मु.पो. गोलवरा उत्तरप्रदेश) असे पलानय केलेल्या कैद्याचे नाव आहे.
खात्याअंतर्गत केलेल्या प्राथमिक विभागीय चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधिताविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. आरोपी वेदप्रकाशसिंग येरवडा कारागृत एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. मुलीच्या लग्नासाठी त्याला मुळगावी गोलवारा ( रा. जि. सुलतानपुर) उत्तरप्रदेश येथे हजर राहण्यासाठी ७,दिवसाची तातडीची अभिवचन रजा कारागृह उपमहानिरीक्षक येरवडा पश्चिम विभाग पुणे यांनी मंजूर केली होती.
त्यानुसार वेदप्रकाशसिंगला लग्नकार्यास हजर ठेवण्यासाठी कारागृहाकडून आरोपी पार्टीसाठी मागणीपत्र मिळाले होते. त्यानुसार कोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यासह कर्मचारी आरोपी वेदप्रकाशसिंग याला घेऊन त्याच्या गावी गेले होते.