मराठी
राज्यातील ९९.गावांमधील १३.हजार ५००.मिळकत धारकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्या हस्ते अॉनलाईन मिळकत पत्रिका प्रदान

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २६-४-२०२१.
पुणे, दिनांक,२४.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,यांच्या हस्ते ऑनलाईन मिळकत पत्रिका वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज, व बाळासाहेब काळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्या हस्ते राज्यातील ९९.गावांमधील १३.हजार ५००.मिळकत धारकांना ऑनलाईन मिळकत पत्रिका प्रदान करण्यात आली.