मराठी

प्रेमप्रकरणातून २ तरुणांचा खून, हॉटेल मालक ताब्यात

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१८-७-२०२१.
चाकण पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण भागात प्रेमप्रकरणातून वीटभट्टीवर काम करणाऱ्या २ तरूणांचा खून झाला आहे. तर संबधित मुलीवर देखील खुनी हल्ला करण्यात आला असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. सदर खून मुलीच्या कुटुंबातील व त्यांच्याशी संबंधित सहा जणांनी केला असल्याचा प्रकार शनिवारी (दि. १७) सकाळी चाकण जवळील करंजविहीरे येथे उघडकीस आला आहे.

हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक असलेल्या मुलीच्या वडिलांसह सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
बाळू सिताराम गावडे (वय २६) व राहुल दत्तात्रय गावडे ( वय २८) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत.
यांच्यासह अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्रकरा उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव (सर्व जण रा. करंजविहिरे ता. खेड) यांच्यासह सर्व ताब्यात घेतले आहे.
या बाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार करंजविहिरे येथे हॉटेल माणुसकी हे प्रसिद्ध हॉटेल आहे

वीटभट्टीवर काम करणारा कामगार बाळू सिताराम गावडे याने हॉटेल मालक यांच्या २१ वर्षीय मुलीला पळवून नेले होते.
हॉटेल मालक बाळू मरगज यांनी मुलगी व पळून नेणारे बाळू, राहुल व मुलगी यांना पकडून आणून हॉटेल माणुसकी या ठिकाणी लाकडी काठी, लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली, यात बाळू व राहुल मयत झाले आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button