मराठी

प्रधानमंत्री किसान मानधन योजना लाभार्थी नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहिम

अहमदनगर दि. 22 : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ गापातळीवरील सर्वांपर्यंत पोहोचावा, पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी करावी यासाठी दिनांत 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2019 या तीन दिवसाच्या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत निहाय लाभार्थी शेतकऱ्यांची शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाआहे. ही योजना संपूर्ण देशात दि. 9 ऑगस्ट 2019 पासुन सुरू करण्यात आली आहे. अठरा ते 40 वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या राज्यातील सर्व अल्प भुधारक व सीमांत शेतकरी (SMF) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रूपये 3 हजार प्रति माह पेन्शन मिळणार आहे. तसेच लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबास निवृत्त वेतन मिळण्याची सुध्दा तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.

गावपातळीवरील आपले सरकार केंद्रावर ही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी सीएससी धारकांनी नोंदणीसाठी पुर्णवेळ हजर राहुन ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या इतर गावांना सुध्दा या मोहीमेबाबत माहिती देणे आवश्यक आहे. अधिकाधिक नोंदणी या अभियान काळात व्हावी, यासाठी गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून त्यांना या मानधन योजनेबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. या मोहिमेचे अंमलबजावणीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी गावपातळीवरील नियोजनावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे आणि मोहिमेला गती द्यावी, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.

गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये (ASSK) VLE मार्फत लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. त्याकरीता शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी माहिती सोबत घेऊन नोंदणीकरीता आपले सरकार सेवा केंद्रावर जाणे आवश्यक आहे. नोंदणी करतेवेळी कोणतीही रक्कम लाभार्थ्याने भरण्याची आवश्यकता नाही.

मात्र, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एन.पी.एस) कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणारे अल्प व अल्यल्प भुधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (पी.एम.एस.वाय.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना (पी.एम.एल.ही.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पदधारण करणारी / केलेली आजीमाजी व्यक्ती, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी (चतुर्थ श्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळुन) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.) वास्तु शास्त्रज्ञ (आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती उच्च आर्थिक शेतकरी लाभार्थी या प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील. असे स्पष्ट करण्यात आले आहे. ****

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button