मराठी
सकारात्मक विचारसरणी हीच आरोग्याची गुरुकिल्ली — प्रा. चंद्रकांत उकिरडे
संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२६-६-२०२१.
पाथर्डी जुन,
बाबुजी आव्हाड, कनिष्ठ महाविद्यालय मधे”सकारात्मक व्यक्तिमत्व विकास या विषयावर
अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील प्रा चंद्रकांत उकिरडे, यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना प्रा उकिरडे, यांनी नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचाराने विद्यार्थ्याची प्रगती होऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय शालेय जीवनात ठरवून त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे योग, प्राणायाम, ध्यानधारणा, छंद यामधून व्यक्तीचा सकारात्मक विकास हा होत असतो असे प्रतिपादन केले.