मराठी
पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट” : आमदार महेश (दादा,) लांडगें, यांच्या कडून नगरसेवक रवि लांडगे, नाना काटे, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१६-८-२०२१.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश (दादा) लांडगे, यांनी भाजपातील बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे,यांना वाढदिवसानिमित्त “सोशल मीडिया”द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपा आहे. तर विरोधी पक्षात राष्ट्रवादी आहे. मात्र, राजकीय जोडे बाजूला ठेवून राजकीय सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, या हेतूने आमदार लांडगे, यांनी “पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट” ही चळवळ हाती घेतली. त्याद्वारे राजकीय मतभेद आणि विचारधारा वेगळी असली, तरी सुख-दु:खात एकमेकांसोबत राहिले पाहिजे, असा आदर्श घालून दिला आहे.