मराठी

माणुसकीला काळीमा फासणारी आणि तितकीच संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली … दोघांना अटक, १७ जण फरार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, १०-५-२०२१.
माणुसकीला काळीमा फासणारी आणि तितकीच संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. चोरीच्या संशयावरुन तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एकूण एकोणवीस आरोपींनी हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक अरुण टाक, यांचाही समावेश असल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणातील १७.आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलांवर अमानुष अत्याचार करण्यात आलेत. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक, यांच्यासह एकोणवीस नराधमांची विकृती या घटनेमुळं समाजासमोर आली आहे. तिन अल्पवयीन मुलांना नग्न करून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आला.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक ,अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रकरणातील १७.आरोपी अद्याप फरार आहेत. काही दिवसांपूर्वी या तिन्ही अल्पवयीन मुलांना रात्रीच्या सुमारास पिंपरीच्या घाटावर आणण्यात आले. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक,यांच्यासह एकोणवीस जण उपस्थित होते.

तुम्ही आमच्या परिसरात चोऱ्या करता, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. याच कारणावरून या सर्वांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले, बेल्टने अमानुष मारहाण केली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीतर, तर त्यांनी त्यांच्या अंगावर कुत्री सोडली. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button