पिंपरी चिंचवड:स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी राजीनामा द्यावा…शिवसेना

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२९-८-२०२१.
पिंपरी |जामिनावर बाहेर असलेल्या समिती अध्यक्ष . नितीन लांडगे, यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत महापौर व समितीच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी आमदार अॅड . गौतम चाबुकस्वार , शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक अॅ. सचिन भोसले , सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, आजी- माजी नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.
स्थायी समिती बरखास्त करा , नहीं चलेगी नहीं चलेगी , टक्केवारी नहीं चलेगी , ना लाज ना शिष्टाचार . अशा घोषणा देत पिंपरी चिंचवड महापालिका भवन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले . स्थायी समिती कार्यालयावर बुधवारी ( दि . १८ ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धापा टाकून अध्यक् लांडगे यांच्यासह ५.जणांना अटक केली.