पिंपरी चिंचवड* *ऑर्डनन्स फॅक्टरीचे खासगीकरण म्हणजे जनतेची सुरक्षितता धोक्यात…..डॉ. कैलास कदम

संवाददाता, सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२६-७-२०२१.
पिंपरी, पुणे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित ऑर्डनन्स फॅक्टरीचे सात खासगी कंपन्यांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेऊन देशातील सव्वाशे कोटींहून जास्त जनतेची सुरक्षितता धोक्यात आणली आहे. यामुळे कंपन्यांमध्ये काम करणा-या ९७.हजारांहून जास्त कर्मचा-यांचे मुलभूत अधिकार आणि सेवा, शर्तीवर गंडांतर आले आहे. देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी कामगार आणि शेतकरी यांचे सर्वात मोठे योगदान आहे. केंद्रातील भाजपा प्रणित सरकार या दोन घटकांना देशोधडीला लाऊन देशाची संरक्षण यंत्रणा परकीय कंपन्यांच्या हातात देत आहे. याचा देशभरातील कामगार तीव्र निषेध करीत आहेत. तसेच या ४१.कंपन्यांच्या प्रवेशव्दारासमोर सुरु असणारे आंदोलन केंद्र सरकार जो पर्यंत हा आदेश मागे घेत नाही तोपर्यंत सुरुच राहिल असे प्रतिपादन पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, यांनी केले. शुक्रवारी (दि.२३.जुलै) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.