मराठी
पिंपरी-चिंचवड*पुणे जिल्हा पुणे शहर* *बारामती महानगरे महाराष्ट्र मुंबई आणि* *उपनगरेराजकारण* *अजित दादांच्या* *कामाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने घेतली दखल; सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्काराने गौरव

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,८-९-२०२१.
बारामती :
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, यांनी महाराष्ट्रात कोरोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. अजितदादांनी धडाकेबाज निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन कडून ” सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् चे यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्ती साठी जनजागृति केली जात आहें. तसेच करोना मुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सदर संस्था मार्फत व्यक्ती व संस्थाना सम्मानित करण्यात येत आहें.