पिंपरी चिंचवड* *पिंपरीत न्यायालयाची फसवणूक बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला अटक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१८-६-२०२१.

पुणे |चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय कागदपत्रे तयार करणारी एक टोळी पिंपरी परिसरात सक्रिय होती. गुन्ह्यातील आरोपी पुणे आणि इतर कोर्टामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत असत. या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे चक्क न्यायालयाची दिशाभूल केली. पिंपरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे.

पहिल्या गुन्ह्यात सुनील मारुती गायकवाड (वय ५२.रा. चावडी चौक, आळंदी), नंदा एकनाथ थोरात (वय ४३.रा. इंद्रायणी नगर, आळंदी), पौर्णीमा प्रशांत काटे (वय ३०., रा. इंद्रायणी नगर, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

. याबाबत पोलीस शिपाई रोहित सुधाकर पिंजरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यात सलमान ताजुद्दीन मुजावर (वय २४.), समाधान प्रभाकर गायकवाड (वय २३.), श्रीधर मगन शिंदे (वय २३.सर्व रा. काटे चाळ दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed