मराठी
पिंपरी -चिंचवड* *अध्यादेश जारी…! ‘एक वार्ड तीन नगरसेवक’ या पध्दतीनेच होणार

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१.१०.२०२१.
पिंपरी. एक वार्ड तीन नगरसेवक असा मिळून त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते. पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचे असते, असे मत अजित पवार, यांनी व्यक्त केले. त्यांनी यातून प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच महापालिका निवडणुकांसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनाच अंतिम राहणार यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.