पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत ४.हजार ८८३.सदनिकांसाठीची अजित पवार यांच्या हस्ते झाली ऑनलाईन सोडत!

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २२-५-२०२१.
, (दि.२१मे) : सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम राज्य शासनाच्या मार्फत सुरु आहे. २०२२.पर्यंत सर्वांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून नागरिकांनी या प्रकियेमध्ये सहभागी होऊन योग्य त्या सूचना कराव्यात. या सूचना लक्षात घेऊन तशा सुधारणा करण्यात येतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार.यांनी यावेळी केले.
येथील अल्पबचत सभागृहात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२.आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी ३.हजार ११७.व अल्प उत्पन्न घटकांसाठी १.हजार ५६६.असे एकूण ४.हजार ८८३.सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या हस्ते काढण्यात आली.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.