मराठी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुरक्षा विभागाकडून योग्य माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांचा राडा

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१८-६-२०२१.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुरक्षा विभागाकडून योग्य माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी आज स्थायी समितीच्या भर सभेतून काढतापाय घेत सुरक्षा अधिका-यावर संताप व्यक्त केला.पाठीमागे झालेल्या स्थायी समिती सभेत नगरसेवक बनसोडे यांनी सुरक्षा विभागाकडे माहिती मागितली होती. त्यावर मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी पुढील सभेत माहिती देण्याचे आश्वासन दिले होते. आजच्या स्थायी समिती सभेत नगरसेवक बनसोडे यांनी पुन्हा माहिती सादर करण्याची विनंती केली. त्यावर जरांडे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. यावर बनसोडे यांनी संताप व्यक्त करत स्थायी समिती सभेतून काढता पाय घेतला.