मराठी

शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ४८० कोविड मार्शल ठोठावणार दंड … अशी होणार कारवाई!

संवाददाता, पार्वती ढोणे,महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,८-६-२०२१.
पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत लॅाकडॅाउनचे नियम शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरती वर्दळ वाढलेली दिसते. त्यामुळे मास्क वापरणे अपरिहार्य आहे. परंतु काही जण अद्याप सदर नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. त्यावर चाप बसविणेकरिता कोविड प्रतिबंधात्मक उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याबरोबरच, बेजबाबदार विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ४८०.कोविड मार्शलांची नेमणूक करण्यात आली आहे.

शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना समज देऊन ,त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांना मनपामार्फत मास्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निर्धारित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने चालू ठेवल्यास, दुकानदारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक, याप्रमाणे संपूर्ण शहरात १६०.पथके तयार करण्यात आली आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button