पिंपरी चिंचवड पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, यांची येरवडा कारागृहात रवानगी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२९-८-२०२१.
स्थायी समितीच्या अन्य १५ .सदस्यांचीही चौकशी होणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १०, लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे,यांनी न्यायालयास अंतरिम जामीन मिळण्यासाठी आजीचे निधन झाल्याची खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी केलेले लांडगे, यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
मात्र प्रत्यक्षात लांडगे, यांच्या आजी नाही तर वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायायलात दिली. त्यामुळे लांडगे,यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील रमेश घोरपडे, यांनी केला.
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे, (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे, (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लांडगे, यांनी यापूर्वी नियमित जामीनासाठी अर्ज केला आहे. इतर आरोपींनी देखील मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.