पिंपरी चिंचवड महापालिकेने कोव्हिड हॉस्पिटल चालविणाऱ्या स्पर्श संस्थेची केली उचलबांगडी … दाखविला घरचा रस्ता

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे,
महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, ११-५-२०२१.
(दि. ०९ मे) : पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोव्हिड हॉस्पिटल चालविणाऱ्या स्पर्श संस्थेला घरचा रस्ता दाखविण्यात आलाय. ऑटो क्लस्टर कोव्हिड हॉस्पिटलमधील रुग्णांना सेवा देण्याचं कंत्राट त्यांना देण्यात आलं होतं. मात्र त्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर संस्थेचे अनेक गैरप्रकार समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला होता.
त्यानंतर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श संस्थेची उचलबांगडी केली. मोफत बेडसाठी एक लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली होती. यावरून महापालिका सभागृहात तब्बल पाच तास वादळी चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी तोंड सुख घेतानाच, स्पर्श संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसा गुन्हा दाखल होताच, स्पर्शच्या दोन डॉक्टरांसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या.