मराठी
खोटी कागदपत्रे,बोगस बनावट बँक गॅरंटी/एफ डी आर प्रकरणी पिंपरी चिंचवड मनपाच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२-७-२०२१
पिंपरी चिचंवड महानगरपालिकेचे निविदा प्राप्त करत असताना जी कामे १० .टक्के पेक्षा जास्त कमी दराची असतात. ती कामे पुढील प्रत्येक कमी दरासाठी अनामत रक्कम, बँक गॅरन्टी किंवा एफडीआर भरून घेतल्यानंतर सदर कामांना मंजूरी देऊन स्थायी समिती यांच्या मंजूरीने करारनामा करून, कामाचा आदेश दिले जातात. परंतु गेल्या काही दिवसात बोगस बनावट बँक गॅरंटी / एफ.डी.आर. सादर करुन महापालिकेची फसवणूक केल्याचे मा. आयुक्त श्री. राजेश पाटील, यांचे निदर्शनास आले आहे.
यापुढे अश्या प्रकारे मनपाची फसवणूक होणार नाही. यासाठी अशा ठेकेदारांना ४.वर्षासाठी काळया यादीत टाकणे तसेच ज्यांनी बनावट एफ.डी.आर सादर करून कामे मिळवले आहे. अश्या ठेकेदारंवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.