पिंपरी-चिंचवड*महानगर पालिकेत* *एसीबीचा छापा स्थायी समिती अध्यक्षांसह* *चौघांना* *घेतले ताब्यात

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१९-८-२०२१.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षा च्या कार्यालवर बुधवारी दिनांक,१८-८-२०२१, रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने छापा टाकला त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, यांच्या सह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे, महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली सभा संपल्यानंतर पाच च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली स्थायी समिती अध्यक्षा चे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तळमजल्यावरुन तिसऱ्या मजल्यावर आणले दालन बंद करून घेत त्याची चौकशी सुरू आहे पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.