मराठी

कोरोना संदर्भात पिंपरी-चिंचवड, शहारा मध्ये काही भागात बंद

संवाददाता तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
मध्यरात्रीपासून पिंपरी-चिंचवडचा काही परिसर सील पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, पिंपरी चिंचवड शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे, असे कळविण्यात आले आहे.

या आदेशानुसार आदेशानुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोवीड १९ या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रस्तावित केलेल्या विविध उपाय योजनांची अंमलबजावणी या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

संभाव्य होणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. याकरीता कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तरी साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ (एपिडमिक ऍक्ट) मधील तरतुदींनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील खालील नमुद परीसर सील करणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले आहे.

.०८ एप्रिल, २०२० रोजी मध्यरात्री बारा वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहेत –

घरकुल रेसीडेन्सी – बिल्डींग क्र.ए १ ते २० चिखली,
(पवार इंडीस्ट्रीयल परीसर-नेवाळे वस्ती)
जामा मस्जिद, खराळवाडी या भोवतीचा परीसर,

पिंपरी
(गिरमे हॉस्पीटल-अग्रेसन लायब्ररी-क्रिश्ना ट्रेडर्स-चैताली पार्क हौसिंग सोसायटी-खराळआई गार्डन-ओम हॉस्पीटल-ओरीयंटल बँक-सीटी प्राईड हॉटेल-क्रिस्टल कोर्ट हॉटेल-गिरमे हॉस्पीटल)
कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ,

दिघी, भोसरी
(रोडे हॉस्पीटल-एसव्हीएस कॉम्प्युटर-स्वरा गिप्ट शॉपी-साई मंदीर रोड-अनुष्का ऑप्टीकल शॉप-रोडे हॉस्पीटल)

शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव
(शिरोळे क्लिनिक-गणेश मंदीर-निदान क्लिनिक-किर्ती मेडीकल-रेहमानिया मस्जिद-ऑर्कीड हॉस्पीटल-अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक)

त्यानुसार सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच आदेशामधील निर्बंधातून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याऱ्या व्यक्तींना, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने व शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना वगळण्यात येत आहेत, असेही कळवण्यात आले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button