मराठी

पिंपरी – चिंचवड मधील पिंपळे निलख भागात हातात धारदार शस्त्र घेऊन गुंडांची भर रस्त्यात दहशत … वाहनचालकांना मारहाणीचा प्रयत्न!

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,७-७-२०२१.
पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. सांगवी परिसरातील पिंपळे-निलख भागात रविवारी रात्री दोन मद्यधुंद तरुणांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हातात धारदार शस्त्र नाचवत या तरुणांनी रस्त्यावरील जवळपास पन्नास वाहनांना अडवून मारहाणीचा प्रयत्न करत धमकी दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्राथमिक माहितीवरुन प्रतीक खरात आणि चेतन जावरे या दोन तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतंय. परंतु या अगोदर यांची गुंडगिरीची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याचे समजते. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींविरुद्ध एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि या तसेच घटनेचा तपास करण्यासाठी पथके रवाना झाली आहे
दोन्ही आरोपींनी रात्र भररस्त्यात केलेल्या प्रकारामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. संबंधित दोन्ही तरुण कोणत्याही टोळीशी संबंधित नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसेच दारुच्या नशेमध्ये त्यांनी हे कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button