पिंपरी चिंचवड* *दिघीमध्ये अग्निशमन केंद्र आणि क्रीडांगण उभारावे…..संतोष वाळके

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२२-८-२०२१.
पिंपरी पुणे – आळंदी रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे दिघी – बोपखेल परिसरात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या परिसरातील लोकसंख्या सत्तर हजारांहून जास्त आहे. दिघी गावचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश १९९७.ला झाला. यावेळी झालेल्या डीपी प्लॅनमध्ये ३७. आरक्षणे जाहिर करण्यात आली. परंतू यामधील शाळेची इमारत वगळता एकही आरक्षण अद्यापपर्यंत विकसित करण्यात आले नाही.
या परिसरातील लोकसंख्या विचारात घेता नागरीकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन दिघी येथील (आरक्षण क्र. २/१४५. सर्वे नं.०५.) अग्निशमन केंद्राचे आरक्षण आणि दिघी येथिल (आरक्षण क्र. २/११९.गट नं. ८२/८३) येथिल राज्यस्तरीय क्रीडांगणाचे आरक्षण प्राधान्यक्रमाने विकसित करावे अशी मागणी दिघी शिवसेना माजी विभाग प्रमुख संतोष तानाजी वाळके, यांनी आयुक्त राजेश पाटील, यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.