मराठी

पिंपरी-चिंचवड शहरातील ५.टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे शिथिलता नाही- महापालिका आयुक्त राजेश पाटील

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१४-६-२०२१.
पिंपरी चिंचवड | पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) आढावा घेतला. पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने निर्बंधामध्ये शिथिलता दिली नाही.या बाबत अधिक माहिती देताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “मागील आठवड्यातील पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट ५.टक्के तर पिंपरी-चिंचवडचा ५.२.टक्के होता. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी मागील आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट ५.टक्क्यांपेक्षा जास्त होता. त्यामुळे शहरातील निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्यात आली नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील आणखी निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना दिल्या. तर,पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्हीटी रेट ५.टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने निर्बंध आणखी शिथिल केले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी जुन्या निर्बंधाचे पालन करावे”.दरम्यान, पुणे शहरातील दुकानांची वेळ सायंकाळी सातपर्यंत वाढवण्यात आली. हॉटेल रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत खुली राहणार आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button