मराठी
पिंपरी चिंचवड* *काळेवाडी येथील इंदिरा गांधी वसाहात येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, यांची जयंती उत्साहात साजरी

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२-८-२०२१.
तापकीरनगर येथील इंदिरा गांधी वसाहात येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेश माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तापकीर, शिवाजी तेलंगे , बाळू दगडे, अशोक धवारे, उत्तम शिरसागर,विठ्ठल तेलंगे,पिंटू ससाणे, नाना थोरात, शंकर बनकर, बाळू कांबळे, अमोल तेलंगे, बाळू भावसार, तात्या शिंदे, व अंकुश सुकळे, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.