सुनेचा छळ ; राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह (विद्यमान नगरसेविका) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१६.१०.२०२१
पिंपरी : सुनेचा कौटुंबिक छळ, मारहाण, दमदाठी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या माजी महापौर, विद्यमान नगरसेविका मंगला कदम, यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेच्या तक्रारीनुसार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत सुनेने अनेक गंभीर आरोप केले आहेत.
याबाबत तन्वी कुशाग्र कदम, (रा. गणेश सोसायटी, शिवाजीनगर पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे पती कुशाग्र कदम, सासू मंगला कदम, सासरे अशोक कदम, दीर गौरव कदम, जाऊ स्वाती कदम, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तन्वी कदम, यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पती कुशाग्र यांना दारु पिण्याचे व्यसन होते. ते पार्टीला जात. घरी रात्री उशिरा येत असत. त्याबाबत विचारणा केली, असता मला शिवीगाळ करुन दमदाटी करत होते. सर्वंजण मिळून त्रास देत होते.