मराठी

१ जुलै २०२१ पासुन पिंपरी चिंचवड शहरात अशी असणार पे अँड पार्क योजना … १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१-७-२०२१.
पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करणेत येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक १ जुलै २०२१ पासुन पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजना लागु करण्यात येत आहे. यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकुण ४५०.पे अँड पार्कची ठिकाणे आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश व त्यांचे संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील, यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिनांक १ जुलै २०२१ पासुन पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजनेची सुरवात करण्याचे निश्चित केले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button