पुण्यात करोना रूगणाचा ऑक्सिजन अभवी मृत्यू

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २१-४-२०२१.
.पुण्यात कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच उपचारासाठी लागणारा ऑक्सिजनचा मात्र मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या योग हॉस्पिटल प्रशासनानं ऑक्सिजनअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक खासगी रुग्णालयांतही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. पुण्यातील योग हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी १४.आयसीयू आणि २३.ऑक्सिजन बेड आहेत. पण त्यासाठी लागणारा ऑक्सिजनच उपलब्ध नसल्यानं आता कोरोना रुग्णांचे हाल होतायत. सध्या याठिकाणी ११.रुग्ण हे व्हेंटिलेरवर आहेत आणि आमच्याकडं अवघा १.तासाचा ऑक्सिडनचा साठा असल्यां रुग्णालयाचं म्हणणं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा असून एका रुग्णाचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचंही सांगितले
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजनचे २०.सिलिंडर पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते कधी पोहोचतील याची माहिती नसल्याचं डॉक्टर दरक म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ते सिलिंडर मिळाले तरी तो साठा ३.ते ४.तासच पुरू शकेल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं पुण्यात खासगी रुग्णालयांत रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याकडं लक्ष देणं गरजेचं असल्याचं स्पष्ट झालं आहे.