उदघाटन सोहळा.!!* *ब्रेमन चौकातील लहान मुलांच्या वाहतूक पाठशाळेचे लोकार्पण

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,११-७-२०२१.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने औंध येथे उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे उदघाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, यांच्या हस्ते संपन्न झाले.लहान मुलांना रस्ते, ट्रॅफिक तसेच वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण मिळावे,या उद्देशातून सुसज्ज अशा चिल्ड्रनपार्कची निर्मिती करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या माध्यमातून हा ट्रॅफिक पार्क उभारण्यात आला आहे.लहान मुलांच्या मनावर वाहतूक नियम पाळण्याचे संस्कार व्हावेत तसेच वाहतुकीचे नियम पाळणारी संस्कारक्षम नवी पिढी निर्माण करण्यासाठी चिल्ड्रन्स ट्राफिक पार्कची मदत होणार आहे.
यावेळी…
प्रदेशाध्यक्ष आमदार
मा चंद्रकांतदादा पाटील
पुण्याचे महापौर मा.मुरलीधर मोहोळ,
उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष मा.जगदीश मुळीक,
आमदार मा.सिद्धार्थ शिरोळे,
आमदार मा.सुनिल कांबळे,
ओबीसी मोर्चा अध्यक्ष मा.योगेश टिळेकर,
सभागृह नेते मा.गणेश बिडकर,
नगरसेवक मा.प्रकाश ढोरे
नगरसेविका अर्चनाताई मुसळे व सर्व नगरसेवक व मनपा अधिकारी स्थानिक नागरिक उपस्थित होते.