मराठी

हा *पास असेल तरच लोकल प्रवासाची मुभा , ठाकरे सरकारचा नवा निर्णय

संवाददाता,पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२९-६-२०२१.
कोरोनाची (covid-19) पहिली लाट ओसरल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनमधून (mumbai local) प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. पण दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास पुन्हा एकदा बंद करण्यात आला. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. पण असं असतानाही अनेक प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र दाखवून प्रवास करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा प्रवाशांवर आळा घालण्यासाठी तसेच लोकलबंदीचे नियम पाळले जावेत, यासाठी राज्य सरकारकडून नवा नियम आणला जात आहे.

पास मिळवण्यासाठी सरकारची परवानगी
रेल्वे पास मिळवण्यासाठी आता तुम्हाला सरकारची परवानगी आवश्यक करण्यात आलीय. बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढलीय. असे प्रकार रोखण्यासाठी आता ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ (universal travel pass) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. हा युनिव्हर्सल पास मिळाला तरच रेल्वेच्या तिकीट खिडकीवर पास किंवा तिकीट मिळू शकणार आहे. सध्या मध्य रेल्वेतून १८.लाख प्रवासी प्रवास करत आहेत तर पश्चिम रेल्वेमधून ११
ते १२.लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यापैकी जवळपास पन्नास टक्के प्रवासी बनावट ओळखपत्र बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल’ पास घेणं बंधनकारक राहणार आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button