एक पाऊल भविष्यासाठी … पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून … नवी सांगवी आणि पिंपळे गुरव येथे लोकप्रतिनिधींनी केले वृक्षारोपण

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२७-६-२०२१.
कोरोना झालेल्या अनेक जणांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी अनेकजण सरसावलेले आपण पाहिले. मात्र निसर्गनिर्मित ऑक्सिजन मिळावा याकरिता वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. वृक्षारोपण करताना केवळ शोभेची झाडे लावण्यापेक्षा मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आज ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करताना समाधान वाटले असे प्रतिपादन माजी ‘नगरसेवक शंकरशेठ जगताप’ यांनी केले.
२६ जून २०२१ रोजी ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी येथील स्वामी विवेकानंद नगर येथे वाघजाई मंदिर ते फेमस चौक या नवीन झालेल्या ६० फुटी सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कडेने तसेच पिंपळे गुरव मधील स्मार्ट सिटी अंतर्गत कृष्णा चौक ते निळू फुले नाट्यगृहाच्या रस्त्याच्या कडेने माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.