एकाच दिवशी दोन कुख्यात गुंडांच्या पुणे जिल्ह्यात हत्या … एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने वार

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१४-७-२०२१.
पुणे जिल्ह्यात कुख्यात गुंडांच्या हत्या झाल्याच्या दोन घटना एकाच दिवशी उघडकीस आल्या आहेत. खेड-राजगुरु नगरमध्ये राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली. गोळीबारानंतर डोक्यात दगड टाकून राहुलला संपवण्यात आलं, तर दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगरमध्ये पाबळ रोडवर तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली. राहुल उर्फ पप्पू वाडेकर, असं हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाला असल्याचा खेड पोलिसांचा अंदाज आहे. राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडिपारीचा आदेश झुगारत त्याने खेड राजगुरुनगर शहरात प्रवेश केला, त्यावेळी त्याची हत्या झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed