विशेष पोस्ट
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त शिर्डी येथे आगमन

शिर्डी,अहमदनगर प्रतिनिधी(विलास गिर्हे) दि.30 :- महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे अहमदनगर जिल्हयातील दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. राज्यपाल महोदयांच्या आगमनप्रसंगी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तहसीलदार कुंदन हिरे तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आगमनानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करणार आहेत.