मराठी

निमगाव कोर्‍हाळेत बियर शाॅपीच्या मागील बाजुच्या गोडाउन वर राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाची धडक कारवाई २४ लाख ३९ हजाराचा मुद्दमाल जप्त एकास अटक

अहमदनगर प्रतिनिधी/विलास गिर्‍हे दि.१४- देशात तसेच राज्‍यात कोरोना विषाणूच्‍या संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍य शासनाने ३० एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असतांनाही राहाता तालुक्‍यातील निमगाव को-हाळे येथील आनंद बियर शॉपीच्‍या पाठीमागील बाजूस पत्राशेड गोडावूनमध्‍ये नामांकित कंपनीच्‍या बियर व वाईनचा मोठया प्रमाणत अवैध मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्‍त केला आहे.
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्‍या आदेशानुसार जिल्‍हयातील परिमिटरुम व मद्यविक्री दुकाने दिनांक ३० एप्रिल २०२०पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश दिले असतांनाही राहाता तालुक्‍यातील निमगाव को-हाळे येथील गोडाऊनमध्‍ये किंगफिशर बिअरच्‍या एक हजार बाटल्‍या, वडवायझर अशा वेग वेगळया १७ नामांकित कंपनीच्‍या ६५० मिलीच्‍या ६ हजार ८१६ बाटल्‍या, ५०० मिलीच्‍या ५ हजार ४० बाटल्‍या, ३३० मिलीच्‍या १हजार ५८४ बाटल्‍या तसेच सुलाव्‍हाईट व रेडवाईन, पोर्टवाईन, मदिरा वाईनच्‍या ७५०मिलीच्‍या २१६ बाटल्‍या, ३७५ मिलीच्‍या १ हजार ८बाटल्‍या, ३३०मिलीच्‍या १हजार ४४०बाटल्‍या असे एकूण बिअर व वाईनचे ९६४ बॉक्‍स अवैध रित्‍या बिअर व वाईनाचा मोठया प्रमाणात साठा जप्‍त करण्‍यात आला असून त्‍याचे अंदाजे किंमत रुपये २४ लाख ३९हजार ७२रुपये इतकी आहे..
या प्रकरणी योगेश नंदकुमार कडलग ( राहणार निमगाव को-हाळे ता. राहाता ) यास अटक करण्‍यात आली असून त्याच्याविरुध्‍द मुंबई दारुबंदी कायद्या १९४९चे कलम ६५ (अ)(ई) नुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पुढील तपास राज्‍य उत्‍पादन शुल्‍क कोपरगाव १चे दुय्यम निरीक्षक अजित वडदे हे करीत आहेत.
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागा

चे उपआयुक्‍त प्रसाद सुर्वे यांच्‍या आदेशानुसार अधीक्षक पराग नवलकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली  कोपरगाव विभागाचे निरीक्षक वी टी घोरतळे, अ विभाग अहमदनगरचे  निरीक्षक संजय सराफ भरारी पथक श्रीरामपूचे निरीक्षक अनिल पाटील, कोपरगावचे दुय्यम निरीक्षक अजित वडदे तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री धवल  गोलेकर, पी वी आहेरराव, कैलाश  क्षेत्रे, जवान सर्वश्री  निहाल उर्फ भाऊसाहेब भोर, निहाल शेख,  राजेंद्र कदम, विकास कंठाळे, प्रवीण साळवे,  पांडूरंग गदादे, या पथकाने सहभाग घेतला.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button