मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ‘शशिकांत घुले’ यांच्या वतीने … बोपखेल परिसरात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी!

*राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ‘शशिकांत घुले’ यांच्या वतीने … बोपखेल परिसरात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी!*
संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक, २५-५-२०२१.
(दि२४ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात १ जून पर्यंत कडकडीत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येच्या विस्फोटाला आळा घालण्यासाठी प्रशासनासह अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील सर्वोतपरी प्रयत्न करीत असून आमदार आण्णा बसनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपाध्यक्ष शशिकांत घुले यांनी बोपखेल परिसरात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशिकांत घुले यांच्या संकल्पनेतून आज (२४मे) प्रभाग क्रमांक ४ बोपखेल परिसरातील शिव मल्हार मंदिर शिवनेरी कॉलनी नंबर-१ , शिवनेरी कॉलनी नंबर-२, शिवनेरी कॉलनी नंबर-३, केसरीनगर, शिवछत्रपती चौक या परिसरात सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली.
सॅनिटायझर फवारणी (हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर) फवारणी करण्यात आल्याने शशिकांत घुले यांच्या या उपक्रमाविषयी शहरवासियांकडून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोना महामारी डोके वर काढल्याची घुले यांनी गंभीर दखल घेवून परिसरातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरीता सॅनिटायझर फवारणीचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button