पुणे महानगरपालिकेच्या* *प्रभाग क्रमांक ८. मधील बोपोडी परिसरातील नाईक चाळ,या भागातील राडारोडा उचलण्यात आले.

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी
दिनांक.३०.१०.२०२१.
पुण्यनगरीच्या उपमहापौर व स्थानिक नगरसेविका मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी प्रभाग क्रमांक ८. मधील बोपोडी परिसरातील नाईक चाळ,बोपोडी या भागातील अस्ताव्यस्त पडलेला राडारोडा उचलून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात आली.या ठिकाणी खूप जास्त राडारोडा जमा झाल्यामुळे त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती.पुण्यनगरीच्या उपमहापौर सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांच्या माध्यमातून परिश्रमपूर्वक राडारोडा उचलण्यात आला.हे काम करण्यासाठी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाचे बोपोडी विभागाचे अध्यक्ष मा. अण्णा आठवले,आप्पासाहेब वाडेकर,उत्तम दिवटे यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व थांबुन हा राडारोडा उचलण्याचे काम मार्गी लावले.