मराठी

ओबीसी नेते प्रसाद खामकर पारनेर मतदारसंघात जनता पार्टीच्या नांगरधारी शेतकरी चिन्हावर मैदानात !

सर्वसामान्य कुटुंबातील युवक असून अल्पावधीतच आपली नवीन ओळख निर्माण केलेले तालुक्यातील राजकारनामध्ये जोरदार मुसंडी मारणारे ओबीसी समाजाचे तालुक्यातील नेतृत्व करणारे माळी समाजाचे असणारे प्रसाद खामकर हे वंचीत कडून पारणेर नगर मतदार संघातून इच्छुक होते ,त्यांनी ओबीसी मतदारांच्या गणितावर वंचीत आघाडी ला उमेदवारी मागितली होती , पण अर्ज भरण्यासाठी अल्प वेळ उरली असताना वंचीत आघाडीने तिकीट नाकारले , अश्या परिस्थिती मध्ये मा प्रसाद खामकर यांच्यापुढे पेच प्रसंग उभा राहिला असल्याने ,त्याच पार्श्वभूमीवर 30 तारखेला अहमदनगर येथे त्यांच्या असणारे शेकडो कार्यकर्तेच्या उपस्थिती मध्ये मिटिंग पार पडली , कार्यकर्ते तसेच ओबीसी संघटनाच्या भावनेचा विचार करून ,एकेकाळी देशात प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात सरकार असणाऱ्या जनता पार्टी या राष्ट्रीय पक्ष्याकडून नांगरधारी शेतकरी या चिन्हावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे एकेकाळी नगरजिल्हा हा जनता पार्टीचा बालेकिल्ला होता , आणि ऍड.स्व. नाथ माधवराव शिंदे यांनी जनता पार्टीचे नेतृत्व ही केलं आहे , पत्रकारांना दिलेल्या माहिती नूसार मतदारसंघातील शेतकरी आणि कामगार वर्गच्या प्रश्नच्या समाधानासाठी उमेदवारी करत असल्याचे सांगितलं तसेच खामकर हे माळी समाजाचे असल्याने पारनेर नगर मतदारसंघतील सर्व ओबीसी संघटना तसेच बाराबलुतेदार यांची ताकत पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button