राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचावेत – संजोग वाघेरे पाटील

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख
दिनांक,११-६-२०२१.
कोरोना संकटात राज्य सरकारसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारे जनतेला मदत करण्याची भूमकिा घेण्यात आली. यात नेते, पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. येणा-या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि लोकनेते शरद पवार साहेब यांचे विचार अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे लागणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा २२.व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आज, गुरुवार (दिनांक १०.जून २०२१.) रोजी मांडले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २२.व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पार्टीच्या पिंपरी खराळवाडी येथील मुख्य कार्यालयात पिंपरी येथे माजी महापौर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, माजी महापौर मंगलाताई कदम, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, विद्यमान नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, युवक अध्यक्षl विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, हे ऊपशिस्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *