नारी शक्ती सन्मान सोहळा बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागात उत्सात साजरा -श्री. भाग्यदेव घुले

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे.
महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,१५.१०.२०२१
नवरात्रात बोपखेल गावात महिला भगिनींचा सन्मान सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन सामाजिक एकतेचे भान राखून माता-भगिनींचे योग्य सन्मान करुन आशिर्वाद घेण्यात आले. सन्मान करतेवेळी सर्व क्षेत्रातील त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील माता-भगिनींचा सहभाग करण्यात आला होता. यापाठीमागे बोपखेल-रामनगर-गणेशनगर भागातील रहिवासी माता-भगिनींना ते करत असलेल्या कार्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. महिलाही पूर्ण समक्षमतेने समाजात मानाने राहाव्यात त्या करत असलेल्या सेवेबद्दल समाजाला कळाव्यात हि भावना ठेवून सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्या वेळी बोपखेल गावच्या कन्या यांचा शिवसेना शाखेच्यावतीने ट्राँफी व आरोग्य वर्धिन तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
या मंगलप्रसंगी ज्यांची संकल्पना होती असे श्री. संजय सुपे (सर) श्री. नामदेव घुले, (उपविभाग प्रमुख) श्री. नवनाथ घुले, (मा.उपशाखाप्रमुख शिवसेना) श्री दत्ता घुले, श्री. रोहिदास जोशी, श्री दत्तात्रेय बाळू घुले,श्री. मारुती मोरे,श्री नंदु घुले श्री. सागर गिरी, श्री राजेंद्र येरुणकर,श्री. नितेश तेजी, श्री. राजेश कांबळे, श्री. अमित टिळेकर, श्री. दिलीप घुले, श्री. अशोक वहिले, श्री.गणेश कागदे, श्री. प्रल्हाद घुले, श्री. अरुण मोरे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक श्री. भाग्यदेव घुले, व शाखाप्रमुख श्री. संतोष गायकवाड, यांनी केले होते….